पेट्रोल ऐन नवरात्रात शंभरी ओलांडणार ?

 पेट्रोल २२ तर डिझेल १९ पैसे महाग झालंय.

Updated: Sep 28, 2018, 04:11 PM IST
पेट्रोल ऐन नवरात्रात शंभरी ओलांडणार ? title=

मुंबई : शंभरीपासून अवघे सात रुपये दूर असणारं पेट्रोल ऐन नवरात्रात शंभरी ओलांडणार अशी स्थिती आता निर्माण झालीय.  नांदेडच्या धर्माबादमध्ये आज पेट्रोलचा दर ९३ रुपये ३२ पैसे झालाय. तर डिझेलसाठी ८० रुपये ४४ पैसे मोजावे लागतात. पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये आजही वाढ झालीय. पेट्रोल २२ तर डिझेल १९ पैसे महाग झालंय.

नागरिक हैराण 

 त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलसाठी ९० रुपये ५७ पैसे आणि डिझेलसाठी ७९ रुपये ०१ पैसे  मोजावे लागत आहेत. तर नाशकात पेट्रोलचा दर ९१ रुपये १३ पैसे  तर डिझेलचा दर ७८ पैसे ४१ पैसे झालाय. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर जर सर्वाधिक कर आकारला जातो. देशभरात काल पेट्रोलचे दर २७ पैसे आणि डिझेलचे दर २४ पैसे होते त्यामुळे मुंबईत पेट्रोलच्या एका लीटरसाठी ९० रुपये ३५ पैसे तर डीझेल ७८ रुपये ८२ पैसे मोजावे लागले.

पेट्रोल पंप अपग्रेड 

ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हे पाहता पेट्रोल कंपन्यांनीही पेट्रोल पंपावर असलेल्या आपल्या इंधन डिस्पेंसर्सला अपग्रेड करण्यास सुरूवात केलीयं. पेट्रोलच्या किंमती 3 अंकी झाल्यावरही डिस्पेंसर्सवर ते दिसावं यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

जुन्या पंपांवर दोन आकडेच 

 बहुसंख्य पेट्रोल पंपाना अपग्रेड करण्याची गरज नाहीयं. पण जुन्या पेट्रोल पंपावर केवळ दोन आकड्यातल्याच किंमती दिसताहेत. येत्या दिवसात जर पेट्रोलच्या किंमतीत आणखी 10 रुपयांनी वाढ झाली तर जुन्या डिस्पेंसर्स वाल्या पंपांना अडचण होऊ शकते.  पण सध्या तरी पेट्रोल कंपन्यांना दरवाढ 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटत नाही.