भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कामाचे सादरीकरण करणार आहेत.

Updated: Aug 28, 2018, 11:15 AM IST
भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक title=

नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजधानी नवी दिल्लीत आहेत. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पदाधिकारी असतील. बैठकीचा अजेंडा मिशन २०१९ असणार आहे. दिवसभर चालणा-या बैठकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये होणा-या निवडणूकीची रणनीती आखण्यात येईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कामाचे सादरीकरण करणार आहेत.