मुंबई : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी 11व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या वतीने ई-केवायसीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे निश्चित केली आहे.
(PM Kisan Nidhi 11th Installment)
पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी 11व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून ई-केवायसीला विलंब होत असल्याने हप्त्याची तारीख लांबत चालली आहे. सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे निश्चित केली आहे. जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा.
पीएम किसानच्या 11व्या हप्त्यावरील ताज्या अपडेटनुसार, लवकरच तुमच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत. 11 वा हप्ता 31 मे रोजी खात्यात वर्ग होईल, अशी माहिती सूत्रांनी व्यक्त केली आहे.
हस्तांतरणाच्या विनंतीवर (RFT) राज्य सरकारांनी स्वाक्षरी केली आहे. यानंतर फंड ट्रान्सफर ऑर्डर (FTO) जनरेट होईल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायचे आहेत. यासाठी 80 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे काम पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत 11 वा हप्ता 31 मे पर्यंत जमा करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हप्ता उशिरा येणार आहे. 2021 मध्ये, हा एप्रिल-जुलैचा हप्ता 15 मे रोजी आला. यावेळी ते 31 मे पर्यंत येणे अपेक्षित आहे. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशभरातील 12.5 कोटींहून अधिक शेतकरी नोंदणीकृत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये वर्षातून तीनदा दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत.