२० विद्यापीठांना मोदींचं १० हजार कोटींचं पॅकेज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटना विद्यापीठासहीत देशातील २० सर्वश्रेष्ठ विद्यापीठांसाठी १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. 

Updated: Oct 14, 2017, 06:29 PM IST
२० विद्यापीठांना मोदींचं १० हजार कोटींचं पॅकेज  title=

पटना : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटना विद्यापीठासहीत देशातील २० सर्वश्रेष्ठ विद्यापीठांसाठी १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. यात १० खासगी आणि १० सरकारी विद्यापीठांचा समावेश आहे. या २० विद्यापीठांची यादीही तयार करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

पटना विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी ही घोषणा केली. तत्पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना विद्यापीठाला केंद्रीय विश्वविद्यालयाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. मात्र ही जूनीच मागणी असल्याचं सांगत मोदींनी २० विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी १० हजार कोटींची योजना तयार करण्यात येत असल्याचं सांगून या विद्यापीठांना दिवाळी भेट दिली आहे.