नवी दिल्ली : 'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला केले. 'मन की बात' मधून ते देशवासियांना संबोधित करत आहेत.
सरत्या वर्षातील शेवटची 'मन की बात' सुरू आहे. यावेळी ते वेगवेगळ्या मुंद्यावर बोलत आहेत.
मत हे सर्वात प्रभावी ताकद आहे, म्हणून तरुणांनी मोठ्या संख्येने मतदार म्हणून नोंदणी करा असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
२१ व्या शतकातील भारत कसा असेल? तुमच स्वप्न काय आहे? हे ठरवण्याची ताकद तरुणांमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.
महात्मा गांधीचे स्वप्न असलेल्या 'स्वच्छ भारत' मध्ये मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. तुमचं शहर, गाव यामध्ये मागे राहायला देऊ नका.