पंतप्रधान मोदी झाले पक्षाच्या बैठकीत भावूक

भाजपच्या संसदीय दलाची आज बैठक झाली. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचं जोरदार स्वागत झालं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 20, 2017, 01:38 PM IST
पंतप्रधान मोदी झाले पक्षाच्या बैठकीत भावूक title=

नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय दलाची आज बैठक झाली. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचं जोरदार स्वागत झालं आहे.

हिमाचल आणि गुजरातच्या निकालानंतर भाजपची आज पहिलीच बैठक झाली. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असतांना ३ वेळा भावूक झाले. पंतप्रधान मोदींनी खासदारांना प्रोत्साहित करत पुढे पण असंच काम करण्याचं आवाहन केलं. 

पंतप्रधान मोदी बैठकीच्या ठिकाणी पोहोचताच सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. पीएम मोदींनी हात जोडून सगळ्यांना धन्यवाद केलं. अमित शाहा यांना लाडू खाऊ घालून मोदींचं अभिनंदन केलं. यावेळी 'भारत माता की जय'चे नारे लागले.

गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. यावेळी पक्षाकडून संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचं अभिनंदन केलं.

गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची. भाजपच्या गोटात यावर विचार विनिमय सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे.