पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर 'नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालया'चे उद्धाटन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आज १२२व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालयाचे उद्धाटन केले.

Updated: Jan 23, 2019, 02:33 PM IST
पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर 'नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालया'चे उद्धाटन title=

नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आज १२२व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालयाचे उद्धाटन केले. हे संग्रहालय त्यांनी देशाला समर्पित केले आहे. या संग्रहालयामध्ये सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेशी निगडीत अनेक वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मोदींसह सुभाष चंद्र बोस यांचे नातू चंद्र बोसही लाल किल्ल्यावर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 

नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालयासह पंतप्रधानांनी याद-ए-जालियाँ संग्रहालय, १८५७ साली झालेल्या प्रथम स्वतंत्रता संग्रामवरील संग्रहालय, भारतीय कलेवर आधारित दृकश्राव्य संग्रहालयालाही भेट दिली. संग्रहालय पाहण्यास येणाऱ्यांसाठी त्याची खास प्रकारे रचना करण्यात आली आहे. संग्रहालयामध्ये चित्र, फोटो, अनेक जुन्या गोष्टी, वर्तमानपत्रांची कात्रणे, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप, मल्टीमीडिया तसेच अॅनिमेशनचीही सुविधा आहे. 

सुभाष चंद्र बोस यांनी वापरलेली तलवार, खुर्ची, इंडियन नॅशनल आर्मीची पदके, त्यांचा पोषाखही संग्रहालयातमध्ये ठेवण्यात आला आहे. इंडियन नॅशनल आर्मीविरोधात जो खटला दाखल करण्यात आला होता त्याची सुनावणीही लाल किल्ल्यावर केली गेली असल्याकारणाने हे संग्रहालय येथे उभारण्यात आले आहे.