'निर्लज्ज काँग्रेसकडून जवानांचा अपमान'

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या काश्मीरबाबतच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दामध्ये समाचार घेतला आहे.

Updated: Oct 29, 2017, 04:27 PM IST
'निर्लज्ज काँग्रेसकडून जवानांचा अपमान' title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या काश्मीरबाबतच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दामध्ये समाचार घेतला आहे. निर्लज्ज काँग्रेसकडून जवानांचा अपमान झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. काँग्रेसकडून जवानांचा अपमान झाल्याची टीका मोदींनी केली आहे.

काश्मीर प्रकरणी घोषणा करणारे स्वायत्ततेची मागणी करतात. त्यांना स्वायत्तता दिली पाहिजे असं सांगत ते अतिरिक्त अधिकारांसह भारतात राहतील असं चिदंबरम म्हणाले होते. चिदंबरम यांच्या या वक्तव्यामुळे झालेल्या वादानंतर काँग्रेसनं स्वत:ला चिदंबरम यांच्या वक्तव्यापासून लांब केलं आहे. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक मत हे काँग्रेसचं मत असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

कालपर्यंत सत्तेमध्ये असलेले कोणतीही लाज न बाळगता काश्मीरमध्ये आझादीची मागणी करणाऱ्यांना पाठिंबा का देत आहेत? देशाच्या जवानांचा हा अपमान असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. काश्मीरमधले फुटीरतावादी आणि पाकिस्तान जी भाषा वापरत आहे तीच भाषा काँग्रेस वापरत असल्याची टीकाही मोदींनी केली. 

पाहा काय म्हणाले होते चिदंबरम