नवी दिल्ली : ‘गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये जनतेने दिलेला कौल हा विकासाला दिलेला कौल आहे’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले.
ते म्हणाले की, ‘जीएसटी लागू केल्यावर विरोधक भाजपच्या पराभवाबाबत बोलत होते. पण विधानसभा निवडणुकीत मिळालेला हा विजय दर्शवतो की, जनतेला विकास हवा आहे. बदला घेण्यासाठी मोठी तयारी केली जात होती, पण गुजरात आणि हिमाचलच्या जनतेने कॉंग्रेसच्या आशांवर पाणी फेरलं आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कुशलतेची प्रशंसा केली. अमित शाह यांची कुशल रणनितीने कॉंग्रेसला मात दिली आहे. तसेच विरोधकांवर हल्लाबोल करत ते म्हणाले की, ‘भाजप तुम्हाला पसंत असो वा नसो, पण देशाच्या विकासाचा ट्रॅक डिरेल करू नका. आज जागतिक स्पर्धेच्या युगात भारताला पुढे जायचे आहे तर भारताला विकासाच्या नव्या उंची गाठाव्या लागतील.
#WATCH: PM Narendra Modi at BJP HQ in Delhi https://t.co/Yf3azqwLW9
— ANI (@ANI) December 18, 2017
- मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेश महानगर पालिका निवडणूकीच्या दरम्यान असे बोलले जात होते की, जीएसटीमुळे यूपीच्या शहरांमध्ये भाजप संपेल. गुजरात निवडणुकांच्याआधीही अशाच अफवा पसरल्या होत्या. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातही जीएसटीनंतर महापालिका निवडणुका झाल्या, तिथेही भाजपल जनतेचं मोठं समर्थन मिळालं.
- यावेळी मोदींनी कार्यकर्त्यांना जीतेगा भाई जीतेगा, विकास ही जीतेगा’ असे नारे द्यायला सांगितले.
- हिमाचल प्रदेशनेही ज्याप्रकारचा निकाल दिलाय त्याने कळून येतं की, जर तुम्ही विकास केला नाहीतर ५ वर्षांनंतर जनता तुम्हाला स्विकारत नाही.
- या निकालाने हे सिद्ध होते की, देशातील लोक सुधारांसाठी, विकासासाठी तयार आहेत.
- मी या विजयाचं श्रेय गुजरातच्या लोकांना देतो. मी त्यांना विश्वास देतो की, राज्यातील लोकांना जे हवंय त्यासाठी भाजप पुढील ५ वर्षात त्या दिशेने काम करेल.
- विकासाच्या मुद्द्यावर एकादा पक्ष लगातार विजयी होत असेल तर हे सत्य मान्य करायला हवं. देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण एकत्र यायला हवं.
- कुणी काहीही केलं तरी भाजपचा विजय कुणीही नाकारू शकत नाही. हा सामान्य विजय नाही, हा असामान्य विजय आहे. देशाच्या विकासासाठी राज्याचा विकास महत्वाचा आहे, त्यात गुजरातची भूमिका महत्वाची आहे.
- सत्तेसाठी या निवडणुकीत काही लोकांनी गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न केलाय. पण गुजरातच्या जनतेने तो नाकारला त्यासाठी त्यांचे अभिनंदन.
- गुजरातच्या नागरिकांना एकच सांगायचंय, तीस वर्षांआधी गुजरात जातीवादाचं विष पसरवण्यात आलं होतं. ते काढताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची तीसव वर्ष गेले. आताकुठे गुजरात जातीवादाच्या विषातून मुक्त झालंय.