पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना प्रत्यूत्तर...

म्हैसूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत मोदींनी देशातल्या सर्व खेड्यांपर्यंत वीज पोहचवल्याची दावा केला

Updated: May 1, 2018, 04:29 PM IST
पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना प्रत्यूत्तर...  title=

बंगळुरू : कर्नाटकातील विद्यमान काँग्रेस सरकारनं केलेल्या कामांची यादी पंधरा मिनिटांत कुठल्याही कागदांशिवाय लोकांसमोर सादर करण्याचं आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिलंय. लोकसभेत 
१५ मिनिटं बोलू द्या, मोदींना एक मिनिटंही तिथे बसता येणार नाही, असं विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलं होतं. त्याला उत्तर देताना मोदींनी हे आव्हान दिलंय. अवघ्या १२ दिवसांवर आलेल्या कर्नाटकातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदींनी आज प्रचाराच्या रणधुमाळीत उडी घेतली.

म्हैसूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत मोदींनी देशातल्या सर्व खेड्यांपर्यंत वीज पोहचवल्याची दावा केला. शिवाय यूपीएच्या पहिल्या पंतप्रधान मनमोहन सिंहांनी सर्व गावांपर्यंत वीज पोहचवण्याचं आश्वासन दिलं. पण त्याचं काय पुढे काय झालं? हे आपण पाहिलंय, असं मोदी म्हणाले.

पुढच्या काही दिवसांत मोदी आणि राहुल गांधी दोन्ही स्टार प्रचारक कर्नाटकातल्या रणधुमाळीत चांगलेच सक्रीय असणार आहेत. त्यामुळे आता प्रचाराच्या पहिल्याच भाषणात मोदींनी दिलेलं हे आव्हान राहुल गांधी स्वीकारतात का? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.