पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

Updated: Oct 13, 2018, 12:46 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांना हा मेल पाठवण्यात आला होता. यानंतर दिल्लीतील पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, पूर्वेकडील राज्यातून हा ई-मेल पाठवण्यात आल्याचा अंदाज आहे. यापूर्वी नक्षलवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली होती. नक्षलवाद्यांचा यासंदर्भातील पत्रव्यवहार पोलिसांच्या हाती लागला होता. 

या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वच सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला असून पोलिसांकडून या मेलची चौकशी सुरु आहे.