पंतप्रधान मोदींनी केदारनाथाचं घेतलं दर्शन

लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहोचले आहेत. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भगवान शिवची पूजा केली. जवळपास अर्धातास पूजा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी त्यांनी भाविकांचं अभिवादन केलं.

Updated: May 18, 2019, 12:46 PM IST
पंतप्रधान मोदींनी केदारनाथाचं घेतलं दर्शन title=

केदारनाथ : लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहोचले आहेत. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भगवान शिवची पूजा केली. जवळपास अर्धातास पूजा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी त्यांनी भाविकांचं अभिवादन केलं.

केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी येथे सुरु असलेल्या पुनर्निर्माण कामाची पाहणी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी केदारनाथच्या गुहेमध्ये ध्यान देखील करणार आहे. रविवारी ते बद्रिनाथला जाणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींचं हॅलिकॉप्टर उतरल्यानंतर ते स्थानिक पोशाखात दिसले. पंतप्रधानच्या या अध्यात्मिक दौऱ्यात त्यांनी विजयासाठी आशीर्वाद मागितला. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात १९ मेला मतदान होणार आहे. मागील २ वर्षातला हा पंतप्रधानांचा चौथा दौरा आहे.

गुरुडचट्टीमध्ये ध्यान केल्यानंतर पंतप्रधान मोदी केदारनाथमध्ये ध्यान करणार आहेत. अकारावा ज्योर्तिलिंग केदारनाथ धाम समुद्रसपाटीपासून 11,700 फूट उंचीवर आहे. मंदिर परिसरापासून दीड किलोमीटरवर ही ध्यान करण्यासाठी गुहा आहे. 2013 मध्ये आलेल्य़ा महाप्रलयानंतर येथे केदारनाथ मंदिराचं काम सुरु आहे. त्यावर पंतप्रधान मोदी लक्ष ठेवून आहेत. यावर्षी महाराष्ट्राचे जय शाह यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या गुहेमध्ये जाणारे दुसरे भाविक ठरणार आहे.