आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी कराच- नरेंद्र मोदी

येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करावा असेही मोदींनी सांगितले.

Updated: Jul 29, 2018, 05:59 PM IST
आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी कराच- नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली: आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे. आज झालेल्या 'मन की बात'मधून मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी संत परंपरेचं कौतुक केले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेणे हा एक वेगळा अनुभव असतो, असे मोदींनी म्हटले. 

याशिवाय, येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करावा असेही मोदींनी सांगितले. महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव आहे. गणेश मंडळांची संख्याही प्रचंड आहे. 

याशिवाय, घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते आणि त्यासाठी सुंदर सजावटही केली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, धर्मोकॉल आणि इतर विघटन न होणाऱ्या वस्तुंचा वापर केला जात असतो. त्यामुळे प्रचंड प्रदुषण होते. हे प्रदुषण टाळण्यासाठी सर्वानी नैसर्गिक रंग आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केल्यास पर्यावरणाचं संवर्धन होईल आणि आपला आनंदही द्विगुणित होईल, असे मोदींनी सांगितले.