नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी विशेष संवाद झाला. या वेळी तेल आणि गॅस क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचा उभय देशांनी संकल्प केला. पुतीन आणि मोदी हे ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यानच दोन्ही देशांमध्ये ही चर्चा झाली.
या वेळी भारताने आर्थिक स्तरावर रशियाशी केलेल्या भागिदारीबद्धल पुतीन यांनी आभार मानले. या वेळी मोदी आणि पुतीन यांच्यासह असलेल्या शिष्ठमंडळात तेल आणि प्राकृतिक गॅस क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालय प्रवाक्ता रविश कुमार यांनी ही माहिती दिली.
या वेळी बोलताना रविश कु्मार म्हणाले, दोन्ही देशांनी व्यापार वाढवण्यावरही चर्चेत भर दिला. व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी कशा पद्धतीने काम करायला हवे याबाबतही दोन्ही देशांनी चर्चा केली, असेही रविश कुमार यांनी सांगितले.