आता कष्टकऱ्यांनाही मिळणार पेन्शन! या सरकारी योजनेत 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये

प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित इतर अनेक अशाच कामात गुंतलेल्या लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यात मदत मिळेल.

Updated: Nov 30, 2021, 03:25 PM IST
आता कष्टकऱ्यांनाही मिळणार पेन्शन! या सरकारी योजनेत 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये title=

नवी दिल्ली: केंद्र सरकार आता मजुरांनाही पेन्शन देणार आहे. प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana) ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक उत्तम योजना आहे. या अंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल. या योजनेंतर्गत मजुरांना पेन्शनची हमी सरकार देते. या योजनेत दररोज फक्त 2 रुपये वाचवून तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते.

दरमहा 55 रुपयांच्या बचतीची गरज
ही योजना सुरू केल्यावर तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, 18 व्या वर्षापासून दररोज सुमारे 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.

ही आवश्यक कागदपत्रे गरजेची
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

कुठे नोंदणी करायची

  • यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.
  • कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.
  • सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टलही तयार केले आहे.
  • या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

ही माहिती देणे आवश्यक
नोंदणीसाठी, तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. 

 योजनेचे लाभार्थी
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजनेअंतर्गत, कोणत्याही असंघटित क्षेत्रातील कामगार, ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही. 

या योजनेत गुंतवणूक करू इच्छिनाऱ्या सदस्याचे मासिक उत्पन्न 15 हजारपेक्षा कमी असायला हवे.

या योजनेसाठी कामगार विभाग, एलआयसी, ईपीएफओचे कार्यालय सरकारने श्रमिक सुविधा केंद्र बनवले आहे. येथे जाऊन कामगारांना योजनेची माहिती मिळू शकते. 

या योजनेसाठी सरकारने 18002676888 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही योजनेची माहिती मिळवू शकता.

----

हे ही वाचा

Gold Rate Today | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक वाढली; जाणून घ्या आजचे दर
Star Health | राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक असलेली कंपनीचा IPO खुला होणार; काय असावी स्ट्रॅटेजी? वाचा