पंतप्रधान करतील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा'

दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधून पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी मन की बातच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 16, 2018, 11:49 AM IST
पंतप्रधान करतील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' title=

नवी दिल्ली : आता बातमी परीक्षा पर चर्चाची, दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करणार आहेत.

'मन की बात'च्या माध्यमातून संवाद

परीक्षेआधी पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांची शाळा घेणार आहेत. दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधून पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी मन की बातच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. 

विद्यार्थ्यांना काही टीप्सही देतील

परीक्षेआधीचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न पंतप्रधान करणार आहेत. यावेळी मोदी विद्यार्थ्यांना काही टीप्सही देणार आहेत. परीक्षेची तयारी, आत्मविश्वास, करीअर यासंदर्भात मोदी मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा आहे.