श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे.
दहशतवादी संघटना असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. अनंतनाग येथील बीजबहाडा रेल्वे स्थानक परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे.
दहशतवादविरोधी मोहिम रावबत असताना सुरक्षा रक्षकांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आदिल अहमद भट असे आहे. तो हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य असून बिजबेहरामधील जिबलीपोरा येथे राहत होता.
J&K: Anantnag police arrested Hizbul Mujahideen terrorist Aadil Ahmad Bhat from Bijbehara railway station. pic.twitter.com/2qgbVYqzgP
— ANI (@ANI) September 20, 2017
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी आदिल अहमद भट याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी आदिल आपल्या सहकाऱ्याची भेट घेण्यासाठी निघाला होता. यासंदर्भातली माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सुरक्षा दल, पोलीस आणि सीआरपीएफने सापळा रचत त्याला अटक केली.