पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा 5 हजार कमावा, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

यामध्ये तुम्ही वार्षिक किंवा प्रत्येक महिन्यात एकरकमी रक्कम जमा करून परतावा मिळवू शकता. 

Updated: Jul 23, 2021, 09:35 PM IST
पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा 5 हजार कमावा, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या title=

मुंबई : पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकीच्या बाबतीत अधिक चांगली मानली जाते. यामध्ये तुम्ही वार्षिक किंवा प्रत्येक महिन्यात एकरकमी रक्कम जमा करून परतावा मिळवू शकता. याद्वारे आपण आपले मासिक उत्पन्न वाढवू शकता. यामध्ये फक्त 1000 रुपयांसह तुम्हाला खाते उघडता येते. दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीवर त्याचे उत्पन्न खूप जास्त येते. (Post Office MIS)

एमआयएसद्वारे (Post Office MIS) आपण दरमहा 5 हजार पर्यंत मिळवू शकता. यामध्ये संयुक्त आणि सिंगल असे दोन्ही खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.

खाते कसे उघडावे?

पोस्ट ऑफिसच्या एमआयएसमध्ये एकरकमी पैसे जमा करून तुम्ही स्वतःसाठी मासिक उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. जर तुमचे खाते एकच असेल तर तुम्ही जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. त्याचबरोबर संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त 9 लाखांपर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते.

या योजनेत मुलांच्या नावे खातेही उघडता येते. यासाठी पालक किंवा त्याचा कोणा गार्डीयन याची काळजी घेईल. नंतर, जेव्हा ते मुलं 10 वर्षांचे होतील तेव्हा ते त्यांच्या नावाने देखील हे खाते स्वत: चालवू शकतील.

5 हजार कसे मिळवायचे?

या योजनेत सध्या 6.6% व्याज दिले जात आहे. जर तुम्ही एकाच खात्याअंतर्गत साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर सध्याच्या व्याजदराप्रमाणे तुम्हाला वर्षाकाठी 29 हजार 700 रुपये मिळतील.

दुसरीकडे जर तुम्ही संयुक्त खात्याअंतर्गत 9 लाखांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला वर्षाला 59 हजार 400 व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा 4 हजार 950 रुपये परतावा मिळेल.

मॅच्योरिटीपूर्वी पैसे काढायचे असतील तर शुल्क किती?

एमआयएस खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. परंतु आवश्यक असल्यास, ते तुम्ही बंद करु शकता. परंतु यासाठी खाते उघडल्यापासून एक वर्षाचा कालावधी असणे आवश्यक आहे.

मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी तुमच्या ठेवीच्या रकमेतून दोन टक्के शुल्क आकारले जाईल. दुसरीकडे, जर आपण 3 वर्षानंतर पैसे काढले तर त्यावर 1 टक्के फी भरावी लागेल. (Post Office MIS)