Post Office : पोस्ट ऑफिस बचत योजनांबात मोठी बातमी, गुंतवणूक करणार्‍यांसाठी खुशखबर

Post Office News :   केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Sep 30, 2022, 11:02 AM IST
Post Office : पोस्ट ऑफिस बचत योजनांबात मोठी बातमी, गुंतवणूक करणार्‍यांसाठी खुशखबर title=

Increase in interest rate of post office savings schemes : किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांसह इतर अल्प बचत योजनांत गुंतवणूक करणार्‍यांसाठी खुशखबर आहे. पोस्टाच्या बचत योजनांच्या व्याजावर वाढ होणार आहेत. तसे केंद्र सरकारने संकेत दिलेत.  काही अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 30 आधार अंकांपर्यंत (basis point) वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला. सध्या अर्थव्यवस्थेत चढ्या व्याजदराचा कल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, पोस्टातील तीन वर्षांच्या ठेवींवर चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आता 5.8 टक्के दराने व्याज मिळेल. आधी हा दर 5.5 टक्के होता. याचाच अर्थ या ठेवींवरील व्याजदरात 30 आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेचा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठीचा व्याजदर 20 आधार अंकांनी वाढवून 7.6 टक्के करण्यात आला आहे. आधी तो 7.4  टक्के होता. विकास पत्रांचा व्याजदर आणि कालावधी दोन्ही वाढविण्यात आले. 

 केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.असे असले तरी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससीवरील व्याज दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. किसान विकास पत्रावरील व्याज दर 6.9 टक्क्यांवरुन 7 टक्के करण्यात आला आहे. तर मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यावरील व्याज दरातही वाढ करण्यात आली आहे. या योजनेवरील व्याज दर 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आला आहे.

पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्क्यांऐेवजी 5.7 टक्के व्याज मिळणार आहे. एका वर्षाच्या मुदत ठेव योजनांवरील व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा व्याज दर 5.5 टक्के आहे. पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनांवरील व्याज दरातही बदल झालेला नाही. पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज मिळते.