पॉवर बॅंकचा स्फोट, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपळ

पॉवर बॅंकचा स्फोट झाल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच धावपळ उडाली. 

Updated: Aug 30, 2018, 05:18 PM IST
पॉवर बॅंकचा स्फोट, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपळ title=

मुंबई : पॉवर बॅंकचा स्फोट झाल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच धावपळ उडाली. दरम्यान, संबंधित महिलेला अटक करण्यात आली. त्यानंतर जामिनावर तिची सुटका करण्यात आली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिलेची बॅग तपासत होते. त्यावेळी त्यांच्या बॅगेत पॉवर बँक सापडली. कर्मचार्‍यांनी ती बाहेर काढून दाखवण्यास सांगितले. मात्र, या महिलेने रागाच्या भरात ती पॉवर बँक भिंतीवर फेकली आणि स्फोट झाला. 

दिल्ली विमानतळावर मंगळवारी सुरक्षा तपासाच्यावेळी अभिनेत्री मालविका तिवारी यांनी तमाशा केला. सुरक्षा कर्मचारी मालविका यांची बॅग तपासत होते. त्यावेळी त्यांच्या बॅगेत पॉवर बँक सापडली. कर्मचार्‍यांनी ती बाहेर काढून दाखवण्यास सांगितले. मात्र, मालविका यांनी रागाच्या भरात ती पॉवर बँक भिंतीवर फेकली. त्यानंतर पॉवर बँकेचा स्फोट झाला आणि ठिणग्या उडाल्या. स्फोटाच्या आवाजामुळे विमानतळ परिसरात घबराट निर्माण झाली.

महिलेने हँड ग्रेनेड फेकल्याचा सुरक्षा कर्मचार्‍यांना संशय होता. पण तपासाअंती ती पॉवर बँकच असल्याचे निष्पन्न झाले. स्फोटानंतर तत्काळ महिलेला अटक करण्यात आली. पण काही वेळानंतर महिलेची जामिनावर सुटका झाली. सुरक्षा अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या बॅगेत काही संशयास्पद वस्तू आढळल्या.  या प्रकरणी तिवारींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.