प्रद्युम्न मर्डर : पोलिस तपासात झाली चूक ! 'या' ८ सेकंदाच्या व्हिडीओकडे दुर्लक्ष

प्रद्युम्न मर्डर केसचा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी सीबीआयने केला आहे.

Updated: Nov 11, 2017, 01:14 PM IST
प्रद्युम्न मर्डर : पोलिस तपासात झाली चूक ! 'या' ८ सेकंदाच्या व्हिडीओकडे दुर्लक्ष

नवी दिल्ली : प्रद्युम्न मर्डर केसचा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी सीबीआयने केला आहे.

एका ११ वीतील विद्यार्थ्यानं प्रद्युम्नचा खून केल्याचे सीबीआयनं म्हटलं आहे. त्यानुसार आज सीबीआय आरोपी विद्यार्थ्याला घेऊन आज पुन्हा गुरूग्राम येथील रायन इंटरनॅशलनल स्कूलमध्ये पोहचली.  
 
 शाळेत पोहचल्यानंतर सारा घटनाक्रम पुन्हा रचून तपासणी करण्यात आली. एका सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार, आरोपी विद्द्यार्थी प्रद्युम्नला बोलवताना दिसत आहे. यामध्ये किती सत्य आहे ? हे पडताळून पाहण्यासाठीच हा  प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. 
 
 आरोपी विद्यार्थ्यांनंच बाहेर येऊन शाळेतील शिक्षक आणि माळ्याला प्रद्युम्नच्या स्थितीबाबत माहिती दिली. गुरूग्राम पोलिसांनी या फुटेजमधील ८ सेकंदांकडे दुर्लक्ष केल्याचं उघड झाले आहे.  
 
 ज्या फुटेजच्या आधारे सीबीआयने ११ वीतील एका विद्यार्थ्याला आरोपी बनवले आहे. नेमके तेच फुटेज गुरूग्राम पोलिसांकडून पहायचे राहिले.परिणामी त्यांनी बस कंडक्टरला आरोपी म्हणून समोर केले होते. गुरूग्राम पोलिसांना आरोपी मुलाने रक्तबंबाळ स्थितीत पाहिले असा जबाब दिला होता. 
 
 शनिवार म्हणजे आज ११ वीतील आरोपी विद्यार्थ्याची रिमांड संपली आहे. आज दुपारी सुमारे दोनच्या सुमारास त्याला ज्युविनाईल जस्टिस बोर्डासमोर सादर केले जाईल.