बजेटपूर्वी जाणून घ्या टॅक्स वाचवण्याची खास आयडिया!

मोदी सरकार त्यांचं शेवटचं बजेट सादर करण्यासाठी केवळ एकच आठवडा शिल्लक राहिला आहे.

Updated: Jan 25, 2018, 10:54 AM IST
बजेटपूर्वी जाणून घ्या टॅक्स वाचवण्याची खास आयडिया! title=

नवी दिल्ली : मोदी सरकार त्यांचं शेवटचं बजेट सादर करण्यासाठी केवळ एकच आठवडा शिल्लक राहिला आहे.

टॅक्स स्लॅबमध्ये सूट मर्यादा वाढवली जाऊ शकते. ही मर्यादा २.५ लाख रूपयांहून ३ लाख रूपये होऊ शकते. जर तुमचं उत्पन्न या मर्यादेच्या जास्त असेल तर टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. 

बॅंक आणि पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं PPF अकांऊट

देशातील २५ सरकारी आणि खाजगी बॅंक तसेच पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ अकाऊंट उघडता येतं. याचा कालावधी १५ महिन्यांचा असतो. या खात्यात तुम्ही वर्षातून १२ वेळा पैसे जमा करू शकता. ५ तारखेच्या आधीच तुम्ही पैसे जमा केल्यास तुम्हाला त्या रकमेवर सुरू महिन्याचं व्याज मिळू शकतं. सध्या या खात्यावर ७.८ टक्के वार्षीक व्याज मिळतं. 

१.५ लाखपर्यंत टॅक्स सूट

पीपीएफ अकाऊंटमध्ये तुम्ही वर्षाला ५०० रूपयांपासून ते १,५०,००० रूपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. यावर चक्रवाढ व्याज मिळतं. पीपीएफ अकाऊंटवर मिळणा-या व्याजावर टॅक्स लागत नाही. त्यासोबतच या खात्यात जमा केल्या जाणा-या कोणत्याही रक्कमेवर टॅक्स लागत नाही. म्हणजे तुम्ही या खात्यात १.५० लाख रूपये जमा करून टॅक्स वाचवू शकता. 

जास्त रक्कमेवर व्याज नाही

जर तुम्ही या खात्यात १.५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्यावर कोणतीही सूट मिळणार नाही. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावानेही अकाऊंट उघडू शकता. पण एकाच मुलाच्या नावाने वेगवेगळे अकाऊंट उघडता येत नाही. 

कधी काढू शकता रक्कम

पीपीएफ अकाऊंटचा कालावधी १५ वर्षांचा असतो. नंतर हा कालावधी विनंती करून १ ते ५ वर्ष वाढवता येऊ शकतो. जर गंभीर आजार, शिक्षण आणि घर यांसारख्या गोष्टींसाठी ५ वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला कशासाठी पैसे काढायचे आहेत याची कागदपत्रे दाखवावे लागतील.