लवकरच 18 वर्षाखालील लहान मुलांनाही लस देण्याची तयारी; भारत बायोटेकला सूचना

कॅनडा आणि अमेरिकेत लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीला परवानगी देण्यात आली आहे

Updated: May 12, 2021, 07:38 AM IST
लवकरच 18 वर्षाखालील लहान मुलांनाही लस देण्याची तयारी; भारत बायोटेकला सूचना title=
representative image

नवी दिल्ली : कॅनडा आणि अमेरिकेत लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीला परवानगी देण्यात आली आहे. भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांचा विचार करता 18 वर्षाखालील मुलांनाही लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.

 लसीकरणासाठी सुरू असलेले प्रयत्नात सर्व काही व्यवस्थित झाल्यास कॅनडा आणि अमेरिकेनंतर भारताततही 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक स्वदेशी लस लवकरच तयार असणार आहे. अधिकृत सुत्रांच्या मते, सेंट्रल ड्रग्ज स्टॅडर्ड कंन्ट्रोल ऑर्गेनाइजेशनच्या विषय समितीच्या तज्ज्ञांनी मंगळवारी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीची शिफारस केली आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, AIIMSदिल्ली, AIIMS पटना, आणि मेडिट्रिना इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंन्स नागपूरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या घेण्यात येतील. विषय समितीने मंगळवारी हैद्राबाद येथे भारत बायोटेकच्या प्रस्तावावर विचार केला आहे.

डेटा मॉनिटरिंग बोर्डला चाचणीची माहिती द्यावी लागेल
सुत्रांच्या मते, तज्ज्ञांच्या समितीने कंपनीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी CDSCO परवानगी घेण्याआधी, DSMB ला दुसऱ्या फेजचा सुरक्षा डेटा देण्याबाबात सूचना करण्यात आल्या आहेत.

ICMRच्या सहकार्यांने भारत बायोटेक कंपनीच्यावतीने स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीचे निर्माण करण्यात आले आहे. सध्या 18 वर्षावरील  लोकांसाठी लसीकरण सुरू आहे.