Narendra Modi | बुस्टर डोस आणि मुलांच्या लसीकरणाबाबत पंतप्रधानांकडून महत्त्वाची माहिती

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशवासियांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन संबोधित केलं. 

Updated: Dec 25, 2021, 10:39 PM IST
Narendra Modi | बुस्टर डोस आणि मुलांच्या लसीकरणाबाबत पंतप्रधानांकडून महत्त्वाची माहिती title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशवासियांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन संबोधित केलं. लहान मुलांना लसीकरणाला नववर्षापासून सुरुवात होणार आहे. तर सोबतच ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. (Prime Minister Narendra Modi announce To Child Vaccination for 3 january 2022 and frontline worker booster dose Omicron variant and Health system)  

पंतप्रधान काय म्हणाले?

देशात 3 जानेवारी 2022 (3 January 2022) पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. तर यानंतर बरोबर आठवड्यानंतर कोरोना योद्ध्यांना 10 जानेवारीपासून (10 January 2022) कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.  

कोरोनाच्या काळात या कोरोना योद्ध्यांनी आपल्या जीवावर उदार होवून आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलं. आता देशात ओमायक्रॉनच्या विषाणूचा धोका आहे. त्यामुळे या कोराना योद्ध्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे. 

ओमायक्रॉन विरुद्ध लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

1.40 लाख ICU बेड्स आहेत

90 हजार बेड्स मुलांसाठी आहेत

4 लाख ऑक्सिजन किट्स राज्यांना दिल्या

141 कोटी लोकांना लस दिली

61% लोकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले

100% लसीकरण गोवा आणि हिमाचल प्रदेशात झाले

राज्यांना मदत केली जात आहे

ज्येष्ठांनाही डोस 

कोरोना योद्ध्यांसह 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रॉकॉशनरी डोस देण्यात येणार आहे. गंभीर आजारांचा संसर्ग असलेल्या तसेच कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठांना लस मिळणार आहे.