मोदी सरकारकडून केरळला ५०० कोटींची मदत

गेल्या १०० वर्षांतला केरळमधील सर्वात भीषण पूर

Updated: Aug 18, 2018, 12:59 PM IST
मोदी सरकारकडून केरळला ५०० कोटींची मदत title=

नवी दिल्ली: केरळच्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारने शनिवारी आणखी पाचशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि अधिकाऱ्यांसह एक बैठक घेतली. यावेळी राज्याचे १९ हजार ५१२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी मोदींना दिली.
 
महापुरामुळे केरळमध्ये हाहाकार माजला असून ३२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १०० वर्षांतला केरळमधील हा सर्वात भीषण पूर असल्याचे हवामान खात्याने सांगितले. 
 
 या पार्श्वभूमीवर केरळमधील आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीसाठी साकडे घातले होते. गृहमंत्र्यांनी १२ ऑगस्ट रोजी १०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्याव्यतिरिक्त ही ५०० कोटी रुपयांची मदत असणार आहे. याशिवाय पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीचीही घोषणा करण्यात आली आहे.