एका दिवसाचे खासगी रुग्णालयाने उपचारापोटी 3.7 लाख रुपये केले वसूल, कोरोना रुग्णाचा मृत्यू

देशात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. 

Updated: May 1, 2021, 12:32 PM IST
एका दिवसाचे खासगी रुग्णालयाने उपचारापोटी 3.7 लाख रुपये केले वसूल, कोरोना रुग्णाचा मृत्यू  title=
प्रतिकात्मक छाया

मुंबई : देशात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा आहे. त्यातच बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक मेताकुटीला आले आहेत. आता एका खासगी रुग्णालयाने (Private Hospital)कहरच केला आहे. भरसाठ बिल रुग्णाच्या माथी मारले आहे. मथुरा (Mathura) येथील एका खासगी रुग्णालयात एक दिवसाच्या उपचारासाठी चक्क 3.7 लाख रुपये वसूल करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. एवढा खर्च करुनही कोरोना पेशंट वाचू शकला नाही. त्याचा मृत्यू झाला.

 देशातील कोरोनाव्हायरसमुळे एक आक्रोश पाहायला मिळत आहे आणि रुग्णालयात रुग्ण मोठ्याप्रमाणात दाखल होत आहेत. दरम्यान, काही खासगी रुग्णालये या उपचारासाठी भरमसाठ पैसे आकारत आहेत. अशीच घटना उत्तर प्रदेशमधील मथुरा येथून समोर आली आहे. कोविड केअर सेंटरमधील खासगी कोविड रुग्णालयाने सरकारच्या दरापेक्षा 20 पट जास्त पैसे आकारल्याचे पुढे आले आहे.

रुग्णालयाने 3.7 लाख रुपये वसूल केले

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, 42 वर्षीय हेमलता अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मथुरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु काही तासातच उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयाने एक दिवसाच्या उपचारासाठी कुटुंबातील सदस्यांकडून 3.7 लाख रुपये वसूल केले.

डीएम यांनी दिले चौकशीचे आदेश 

मथुराचे जिल्हा न्यायदंडाधिकारी (डीएम) नवनीतसिंह चहल यांनी खासगी रुग्णालय केडी मेडिकल कॉलेजविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या साथीच्या संकटाच्या वेळी रूग्णांकडून अधिक पैसे वसूल करण्याची कोणतीही संधी रुग्णालये सोडली नसल्याचे धक्कादायक प्रकरण पुढे आहे.

ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर परत केले 3 लाख  

रुग्णालयाने सुरुवातीला संपूर्ण 6.75 लाख रुपये परत देण्यास नकार दिला होता, जे रुग्ण भरतीच्या वेळी कुटुंबाने जमा केले होते. डॉक्टर आणि रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांमधील कथित संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पीडित मुलीच्या कुटुंबाला 3 लाख रुपये परत केले.

रुग्णालयाच्या मालकाने स्पष्टीकरण  

केडी रुग्णालयाचे मालक मनोज अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या रुग्णालयात  काम करणाऱ्या डॉ. भल्ला यांचे ऑडिओ रेकॉर्डिंगबद्दलही ऐकले आहे. त्याने सांगितले की या घटनेविषयी मी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या डॉ. भल्ला दिल्लीत आहेत आणि ते आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे. ते पुढे म्हणाले की कोविड -19 रुग्णांवर सरकारी दरानुसार उपचार केले जातात.