तरूणाईला वेड लावणाऱ्या पब्जी कंपनीची मोठी घोषणा

देशात पब्जी कंपनी 2 नवीन मोबाईल गेम लॉन्च करणार... जाणून घ्या काय आहे खास

पोपट पिटेकर | Updated: Nov 23, 2022, 12:15 AM IST
तरूणाईला वेड लावणाऱ्या पब्जी कंपनीची मोठी घोषणा title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : भारतातील मोबाईल गेम पब्जीचे (Pubg) अनेक फॅन फॉलोवर (fan following) आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या खेळाचे वेड लागले आहे. क्राफ्टन, पब्जी आणि बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (Battleground Mobile India ) गेम्स विकसित आणि प्रकाशित करणारी कंपनी, दोन नवीन मोबाइल गेमवर (Mobile game) काम करत आहे. कंपनी लवकरच हे दोन नवीन गेम भारतात रिलीज करण्याच्या तयारीत  आहे. कंपनीचा एक गेम या वर्षी 2 डिसेंबरला लॉन्च (Launched in December) होईल आणि दुसरा गेम पुढील वर्षी लॉन्च केला जाणार आहे.

क्रॉफ्टन कंपनी (Crofton Company) भारतात तसेच संपूर्ण जगामध्ये जे दोन नवीन मोबाईल गेम लॉन्च (Mobile game launch) करणार आहे ते कॅलिस्टो प्रोटोकॉल आणि डिफेन्स डर्बी (Callisto Protocol Defense Derby) आहेत. क्राफ्टनचे पहिले दोन मोबाईल गेम, पब्जी आणि नंतर BGMI, मुलांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन भारतात बंदी (game Banned in India) घालण्यात आली आहे. आता कंपनीचे हे दोन नवीन गेम कसे आहेत आणि त्यांना भारतात काय प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल. क्राफ्टन ही दक्षिण कोरियाची गेम डेव्हलपर कंपनी आहे. पब्जी ( PUBG) नंतर या कंपनीचे नाव जगभरात आहे. आता कंपनी डिसेंबरमध्ये जागतिक बाजारात आपला नवीन गेम कॅलिस्टो प्रोटोकॉल (The Callisto Protocol ) रिलीज करणार आहे

गेमची वैशिष्ट 
कॅलिस्टो प्रोटोकॉल गेम संगणक (Callisto Protocol Game Computer) आणि गेमिंग कन्सोलवर खेळलं (gaming console) जाणार आहे. हा गेम क्राफ्टनच्या स्ट्रायकिंग डिस्टन्स स्टुडिओने ( Striking Distance Studios) बनवला आहे. तर दुसरा गेम डिफेन्स डर्बी (Game Defense Derby) हा मोबाईल गेम (Mobile game) आहे. गेम कंपनीच्या रायझिंग विंग स्टुडिओने (Rising Wing Studios) विकसित केला आहे. गेमच्या खास वैशिष्ट्याबद्दल सांगायचं झाले तर  हे गेम्स पब्जी (PUBG) आणि BGMI पेक्षा पूर्णपणे वेगळे असतील. कॅलिस्टो प्रोटोकॉल (Callisto Protocol) हा सर्व्हायव्हल हॉरर गेम (Survival horror game) आहे, तर डिफेन्स डर्बी (Defense Derby) हा रिअल-टाइम स्ट्रॅटेजी डिफेन्स गेम (real-time strategy defense game) आहे. कॅलिस्टो प्रोटोकॉल गेम कॅलिस्टोवर (Callisto protocol game on Callisto) आधारित असणार आहे.