नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरस रुग्णांवरील उपचारासाठीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्याशिवाय सरकारने आता रुग्णांना घरी सोडण्यापासून ते क्वारंटाईनपर्यंच्या प्रक्रियांमध्ये नव्या सूचना जाहीर केल्या आहेत. नव्या सूचनांनंतर, सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच प्रश्नांची काही उत्तरं देण्यात आली आहेत.
रुग्णांच्या डिस्चार्जपासून, टेस्टवर आधारित रणनिती ते लक्षणांवर आधारित टाईम बेस्ड स्ट्रेडेजीमध्ये बदल केले गेले. ICMR च्या लॅब-आधारित समीक्षेदरम्यान असं आढळून आलं की, सुरुवातीच्या RTPCR टेस्टनंतर रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर, पुढील 10 दिवसांत, चाचणी अनेकदा निगेटिव्ह आली. अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की, व्हायरस अगदी वरच्या टप्प्यात पोहचल्यानंतर 7 दिवसांत बरा होऊ लागतात.
रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर किंवा रुग्णाला घरी सोडण्यात आल्यानंतर ट्रान्समिशन होतं, असा कोणताही पुरावा सध्या दर्शवण्यात आलेला नाही. रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर रुग्णाला पुढील 7 दिवस होम आयसोलेशनच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.
रुग्णाला अगदी हलकी लक्षण असल्यास होम आयसोलेशननंतर चाचणी करण्याची आवश्यकता नाही. आरोग्य मंत्रालय सतत परिस्थितीनुसार, नियमांमध्ये बदल करत आहे. त्यानुसार आता हलकी लक्षणं असणाऱ्या रुग्णांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येण्यााबाबत सांगण्यात आलं आहे.