Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!

Rahul Gandhi, Budget Session 2023: पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.

Updated: Feb 7, 2023, 04:13 PM IST
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!  title=
Rahul Gandhi, Budget Session 2023

Rahul Gandhi, Gautam Adani: हिंडेनबर्गच्या अहवालामुळे (hindenburg research) उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Adani share price) सुरू असलेल्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये (Gautam Adani Wealth) देखील मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे 150 दिवसांपूर्वी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अदानींची 22 व्या स्थानी घसगुंडी झालीये. अशातच आता भारत जोडो यात्रेतून चार्ज झालेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपलं नवं रूप लोकसभेत दाखवलं.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session 2023) सहाव्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी त्यांनी अदानी, महागाई, बेरोजगारी आणि अग्निवीर योजनेवरून जोरदार बॅटिंग केली. बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. त्यावेळी त्यांनी दाखवलेल्या फोटोची एकच चर्चा होताना दिसत आहे.

काय म्हणाले Rahul Gandhi?

2014 साली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी 609 व्या क्रमांकावर होते, मात्र गेल्या काही वर्षात जादू झाली की नाही माहित नाही पण ते अचानक दुसऱ्या स्थानावर आले, असं म्हणत त्यांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप खासदारांनी काहीसा गोंधळ देखील घातला. भारताच्या पंतप्रधानांशी अदानी यांचं काय नातं का आहे?, असा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi In loksabha) यांनी विचारला आणि सभागृहाचं वातावरण तापलं.

आणखी वाचा - मोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले

बोलत असताना राहुल गांधी यांनी सोबत आणलेला एक फोटो देखील दाखवला. त्यात एका प्लेनमध्ये गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी (Gautam Adani, Narendra Modi) दिसत आहेत. राहुल गांधी यांनी फोटो दाखवल्यानंतर भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं. पोस्टरबाजी बंद करा, अशा सुचना देखील त्यांनी केल्या. राहुल गांधी आरोप करत असताना इतर काँग्रेस खासदारांनी मोदी है तो मुमकीन हे असे नारे लगावले.

दरम्यान, अग्नीवीर योजना (Agniveer Yojana) ही सैन्याची नाही, असं निवृत्त लष्कर अधिकारी सांगतात असं राहुल गांधी यांनी सांगितलं. अग्निवीर ही योजना अजित डोव्हालांनी (Ajit Doval) आर्मीवर थोपवलेली योजना असल्याची टीका राहुल गांधीनी लोकसभेतील (Rahul Gandhi in Loksabha) भाषणात केली.