मोंदीवर राहुल गांधींची टीका, 'केवळ मोठ मोठ्या बाता मारतात'

 गुजरातमध्ये भरुचमध्ये झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची झोड ठवली.

Updated: Nov 1, 2017, 09:37 PM IST
मोंदीवर राहुल गांधींची टीका, 'केवळ मोठ मोठ्या बाता मारतात' title=

भरुच : काँग्रेस उपाध्याक्ष राहुल गांधी आज पुन्हा एकदा गुजरातमध्ये दाखल झालेत. त्याच्या  गुजरात दौ-याचा तिसरा टप्पा भरूचमध्ये सुरु झाला. भरुचमध्ये झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची झोड ठवली.

पत्रकार परिषदा घेऊन अर्थिक परिस्थितीबद्दल मोठ मोठ्या बाता मारल्या जातात. पण प्रत्यक्षात देशाची स्थिती फारशी चांगली नाही. नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था कोलमडल्याचा पुनरुच्चार यावेळी राहुल गांधींनी केला. त्याचप्रमाणे सरकारनं किती सांगितलं, तरी गुजरातचा अंडरकरंट भाजपच्या विरोधातच असल्याचा दावाही राहुल गांधींनी यावेळी केला.