नाहरगड किल्ला मृतदेह प्रकरण : 'चेतनची आत्महत्या नव्हे हत्याच'

मृतदेह आणि दगडांवर 'पद्मावती'ला दर्शवलेला विरोध यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे.  'आत्महत्या नव्हे हत्याच'

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2017, 04:23 PM IST
 नाहरगड किल्ला मृतदेह प्रकरण : 'चेतनची आत्महत्या नव्हे हत्याच' title=

जयपूर : नाहरगड किल्ल्यावरील मृतदेह प्रकरणी धक्कादायक माहिती, चेतनची आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामूळे या घटनेला नवे वळण मिळाले आहे.

गुंतागुंत 

जयपूरमधील नाहरगड किल्‍ल्‍याच्‍या तटबंदीवर आढळलेला मृतदेह आणि दगडांवर 'पद्मावती'ला दर्शवलेला विरोध यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे. 

'आत्महत्या नव्हे हत्याच'

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार चेतन याची आत्महत्या नसून ही हत्या केल्याचा संशय त्याची पत्नी नीतू हिने ब्रम्हपुरी पोलिसांकडे केली आहे. 

'हत्येचा पुरावा नाही'

चेतनची हत्या झाल्याचे परिस्थीतीजन्य पुरावे आम्हाला सापडले नसल्याचे डीसीपी सतेंद्र सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.

आतपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही आत्महत्या आहे पण या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. 

'आमचा संबध नाही' 

दरम्यान या घटनेशी राजपूत करणी सेनेचा काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने आमचा मुद्दा पुढे नेत आहोत, अशा प्रकारे कृत्य करणे ही आमची पद्धत नाही, तसेच अशा प्रकारच्या घटनेला कोणी पाठिंबा देऊ नसे असे महिपाल सिंह यांनी सांगितले. 

'मोबाईल' वरून खुलासा 

चेतनच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलमुळे तपासाला आता योग्य दिशा मिळणार आहे.
 
मृताच्या मोबाईलमध्ये काही सेल्फी फोटो दिसल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रफुल्ल कुमार यांनी दिली.  

चेतनचा मोबाईल फॉरेन्‍सिक सायन्‍स लॅबमध्‍ये पाठवण्‍यात आला असून पुढील चौकशी सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.