नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलीय. यानंतर मुंबईमध्ये रजनीकांतच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
आपण लवकरच स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा करणार असून तामिळनाडूच्या आगामी विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागी आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी केलीय.
तामिळनाडूत लोकशाही धोक्यात असून इतर राज्यांकडून तामिळनाडूचं हसं होत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
रजनीकांत स्वतंत्र पक्ष काढणार की भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत उत्सुकता होती. रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशामुळं तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
रजनीकांत यांनी पक्षाची घोषणा करताच चेन्नईमध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष केलाय. त्यासोबतच मुंबईमध्येही त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
रजनीच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करत आणि फाटाके फोडत त्यांच्या फॅन्सनी या घोषणेचं धुमधडाक्यात स्वागत केलं. रजनीकांत यांचे चाहते केवळ तामिलनाडूतच नव्हे, तर देशभरात आहेत.
चित्रपटसृष्टीशी जवळचं नातं असलेली मुंबईही याला अपवाद नाही. रजनीकांत यांच्या प्रवेशामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल आणि ते राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
मुंबईमध्ये रजनीकांतच्या चाहत्यांनी जल्लोष केला