मुंबई : 2017 या सरत्या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबर रोजी अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं.
त्यांनी असं जाहीर सांगितलं आहे की, तामिलनाडूच्या सगळ्या 234 जागा ते लढवणार आहेत. रजनीकांत यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह आणि वेबसाइट लाँच केली आहे. रजनीकांत यांच्या वेबसाइटचे नाव आहे rajinimandram.com.
सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना या वेबसाइटला भेट देण्यास सांगितले आहे. तसेच अनेकांचे या वेबसाइटद्वारे आभार मानले आहे. या वेबसाईटवर व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हे महत्वाचे आहे की, आपल्या संकेतस्थळावर नोंदणी केलेले आणि नोंदणी न केलेल्या लोकांबरोबरच सामान्य लोकांसोबत या राजकारणात बदल करू इच्छित आहेत.
रजनीकांत स्वतंत्र पक्ष काढणार की भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत उत्सुकता होती. रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशामुळं तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांनी पक्षाची घोषणा करताच चेन्नईमध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष केलाय. त्यासोबतच मुंबईमध्येही त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
रजनीच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करत आणि फाटाके फोडत त्यांच्या फॅन्सनी या घोषणेचं धुमधडाक्यात स्वागत केलं. रजनीकांत यांचे चाहते केवळ तामिलनाडूतच नव्हे, तर देशभरात आहेत. चित्रपटसृष्टीशी जवळचं नातं असलेली मुंबईही याला अपवाद नाही. रजनीकांत यांच्या प्रवेशामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल आणि ते राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.