नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने भारतीय जवानांच्या आणि हुतात्मांच्या परिवारासाठी मदतीचे आवाहन केले आहे. तसेच सरकारच्या या संबंधी एका खास योजनेत सहभागी होण्यासाठी भारतीयांनी पुढे यावे यासाठी केलेल्या प्रयत्नांचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर कौतुक केले आहे.
बुधवारी अक्षयने ट्विटरवर एक खास व्हिडिओ शेअर केला होता. त्याला रिट्विट करताना राजनाथ सिंह म्हणाले, " अक्षय कुमार तुमचा 'भारत के वीर' या कार्यक्रमाला मिळणारा पाठींबा प्रशंसनीय आहे. "
Akshay Kumar ji your support to #BharatKeVeer is commendable. https://t.co/0hN47dcJQs
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 16, 2017
"आपण भारतीयांनी मिळून एकत्रपणे आपल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहायलं हवं. ' भारत के वीर ' या योजने अंतर्गत आपण येत्या ६ महिन्यात ११४ शहीदांच्या परिवाराला मदत करण्यासाठी एकत्र येऊया " असे आवाहन केले आहे. तुमच्या आर्थिक कुवतीनुसार मदत करा.
We owe them a lot & this is the least we can do..support our soldiers by contributing how much ever you can to #BharatKeVeer @rajnathsingh pic.twitter.com/C3TKuMNo3E
— Akshay Kumar (@akshaykumar) August 16, 2017
नुकताच अक्षय कुमारचा ' टॉयलेट - एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपट १०० करोड क्लब मध्ये प्रवेश करेल.