नवी दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर चर्चा झाली. मोदी सरकारनं शिफारसी लागू न केल्यास राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेट्टींनी यादवांना सांगितलं.
आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं शरद यादव यांनी जाहीर केलं आहे. तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार पाहून मतदान करणार असल्याचंही खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.