राकेश झुनझुनवालांनी 'या' शेअरवर खेचला दमदार पैसा; एका वर्षात गुंतवणूक दुप्पट

 गेल्या एका वर्षात राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या इंडियन हॉटेल्सच्या (Rakesh Jhunjhunwala Portfolio) स्टॉकमध्ये 96 टक्के वाढ झाली आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत. 

Updated: Aug 11, 2022, 09:39 AM IST
राकेश झुनझुनवालांनी 'या' शेअरवर खेचला दमदार पैसा; एका वर्षात गुंतवणूक दुप्पट title=

मुंबई :   भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील इंडियन हॉटेल्सच्या स्टॉकमध्ये बुधवारी चांगली तेजी नोंदवली गेली. स्टॉक 277 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनी नफ्यात आल्याने, गुंतवणूकदारांनी पुन्हा कंपनीवर विश्वास दाखवला आणि स्टॉकमध्ये मोठी खरेदी दिसून आली. कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या तिमाहीत 181 कोटी रुपयांचा नफा कमावला, तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 301 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

भारतीय हॉटेल्सच्या स्टॉकमध्ये गेल्या वर्षभरात 96 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत. ब्रोकरेज हाऊसेसच्या मते कंपनीने आव्हानांवर मात केली आहे. हॉटेल उद्योगातील वाढत्या मागणीचा फायदा भारतीय हॉटेल्सना मिळत आहे. सध्या या शेअरमध्ये तेजी कायम राहील, असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. ब्रोकरेज हाऊस जेफरीज आणि जेपी मॉर्गन यांनी याला बाय रेटिंग दिले आहे.

Jefferies चा सल्ला

ब्रोकरेज हाऊस जेफरीजने भारतीय हॉटेल्सवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेजने आपली लक्ष्य किंमत 325 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

ब्रोकरेजचे म्हणणे आहे की कंपनीने पहिल्या तिमाहीत मजबूत निकाल सादर केले आहेत. कमाई 24% वाढली आहे, तर कंपनीचे मार्जिन 29.8% आहे.