Rakesh Jhunjhunwala यांची 'या' कंपनीत मोठी गुंवतणूक, ७ दिवसांपासून लागतोय Upper Circuit

राकेश झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक 

Updated: Aug 3, 2021, 06:55 AM IST
Rakesh Jhunjhunwala यांची 'या' कंपनीत मोठी गुंवतणूक, ७ दिवसांपासून लागतोय Upper Circuit title=

मुंबई : राकेश झुनझुनवाला अनेक लहान-मोठ्या गुंतवणुकदारांना आयडिया देत असतात. यावरून काही गुंतवणूकदार आपला पोर्टफिलिओ तयार करत असतात. जर तुम्ही त्यापैकीच एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. राकेश झुनझुनवाला यांनी काही शेअर्सवर गुंतवणूक करण्याचा दावा केला आहे. (Rakesh Jhunjhunwala to invest in this metal company, stock hits upper circuit)

झुनझुनवाला यांनी एका मेटल्स आणि मायनिंगमध्ये अनोळखी अशी स्मॉलकॅप कंपनी Raghav Productivity Enhancers मध्ये तब्बल 31 करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. रविवारी कंपनीने याबाबत माहिती दिली. ही बातमी बाहेर पडताच सोमवारी Raghav Productivity Enhancers कंपनीला अपर सर्किट (Upper Circuit) लागलं. 

सोमवारी सातव्या दिवशी देखील Raghav Productivity Enhancers कंपनीच्या शेअर्सला अपर सर्किट लागलं. याचे शेअर 4.99 टक्क्यांवर म्हणजे 716.90 रुपयांवर बंद झाले. कंपनीने सांगितलं की,  प्रीफरेंशियल अलॉटमेंट किंवा प्राइवेट प्लेसमेंटच्या माध्यमातून राकेश झुनझुनवाला यांना 30.9 करोड रुपयाचे 6 लाख कम्प्लसरी कंवर्टिबल डिबेंचर (CCD) जाहीर करणार. हे CCD अलॉटमेंटच्या तारखेच्या 18 महिन्यांनी शेअर्समध्ये बदलणार. 

कंपनीबद्दल जाणून घेऊया 

Raghav Productivity Enhancers ही जयपुरची कंपनी आहे. ही रॅमिंग मासमध्ये देशातील सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरमधील एक आहे. Ramming Mass चा वापर स्टील प्लांडमधील इंडक्शन फर्नेसमध्ये केला जातो. याचा वापर ग्लास, सेरेमिक, आर्टिफिशिअल मार्बलस, सेमी कंडक्टर, इलेक्ट्रोड, सोलर, पेंट आणि दुसऱ्या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या हाय ग्रेड क्वार्ट्स पाउडर बनवण्यास याचा वापर होतो. महत्वाची बाब म्हणजे 28 देशांना ही कंपनी निर्यात करते. देशातही या कंपनीच सप्लाय सुरू असतं. 

गेल्या काही दिवसांपासून बिग बुल राकेश झुनझुनवाला हे मेटल्स शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. जून तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी SAIL मध्ये 1.39 टक्के हिस्सेदारी घेतली आहे. राकेश झुनझुनवाला ऍण्ड असोसिएट्सजवळ 38 स्टॉक्स असून एकूण 20,294 करोड रुपयांची गुंतवणूक आहे.