गोव्यात टॅक्सी चालकाचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कार

विमानतळाजवळ तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केला.

Updated: Jun 29, 2018, 06:09 PM IST
गोव्यात टॅक्सी चालकाचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कार title=

पणजी : गोव्यात एक धक्कादायक घटना घडलेय. एका २० वर्षीय तरुणीला जबरदस्तीने पकडून टॅक्सीत बसविले. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर टॅक्सी चालक रवीचंद्र भट याला पोलिसांनी अटक केलेय.

गोव्यातील वास्को शहरातील विमानतळाजवळ तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केला. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली, अशी माहिती  पोलिसांनी दिली आहे.पीडित तरुणी विमानतळाजवळ एकटीच फिरत असताना टॅक्सी चालकाने तिला लिफ्ट देऊ केली. मात्र, या पीडित तरुणीने नकार दिला. त्यानंतर टॅक्सी चालकाने जबरदस्तीने धरुन तिला ओढत टॅक्सीत बसवले. त्यानंतर टॅक्सी वास्को येथील एका निर्जनस्थळी नेली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली.

पीडित तरुणीने याबाबत पोलिसांत तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी चालक विमानतळ मार्गावर टॅक्सी चालवत आहे. तो वास्कोमध्येच वास्तव्यास आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.