देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन, यात काय आहे खास? जाणून घ्या

RapidX Launch: जून 2025 पर्यंत दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS च्या संपूर्ण 82.15 किमी लांबीच्या मार्गावर गाड्या सुरू करण्याचे लक्ष्य असल्याचे NCRTC ने यापूर्वी सांगितले होते.

Updated: Oct 17, 2023, 09:02 AM IST
देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन,  यात काय आहे खास? जाणून घ्या title=

RapidX Launch: आता रेल्वे ट्रॅकवरही तुम्हाला वेगवान प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी 'दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर' चे उद्घाटन  करणार आहेत.  हा कॉरिडॉर 17 किलोमीट लांब आहे.या गाड्या मेट्रो ट्रेनसारख्याच असतील, पण त्यांच्या डब्यांमध्ये सामान वाहक आणि 'मिनी स्क्रीन' सारख्या अनेक सुविधा असतील, अशी माहिती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (NCRTC) अधिकाऱ्यांनी दिली. NCRTC ला दिल्ली आणि मेरठ दरम्यान भारतातील पहिल्या 'प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली' (RRTS) च्या बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

जून 2025 पर्यंत दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS च्या संपूर्ण 82.15 किमी लांबीच्या मार्गावर गाड्या सुरू करण्याचे लक्ष्य असल्याचे NCRTC ने यापूर्वी सांगितले होते. आरआरटीएस गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी त्यांचे सामान सीटच्यावर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक सीटवर वाय-फाय आणि मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) ने गाझियाबाद रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) स्टेशनवर लोकांच्या हरवलेल्या वस्तू त्वरीत परत करण्यासाठी 'लॉस्ट अॅण्ड फाऊंड' केंद्राची स्थापना केली आहे.

 "कोणत्याही प्रवाशाचे स्टेशन परिसरात सामान हरवले किंवा रॅपिडएक्स ट्रेनमध्ये चुकून कोणतीही बॅग किंवा सामान राहिल्यास, तो/ती व्यक्ती स्टेशन कर्मचाऱ्यांशी मदतीसाठी संपर्क करू शकतो. तसेच 08069651515 वर कॉल करुन त्यांना हरवलेल्या वस्तूंची माहिती मिळू शकते. RapidX च्या ग्राहक सेवा केंद्रातून ही हरवलेली वस्तू परत केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. 

हरवलेल्या वस्तू कशा शोधायच्या?
जर एखाद्या रॅपिडएक्स कर्मचाऱ्याला स्टेशन परिसरात किंवा ट्रेनमध्ये एखाद्या प्रवाशाचे हरवलेले किंवा हरवलेले सामान सापडले, तर संबंधित प्रवाशाने 24 तासांच्या आत त्याचे सामान त्याच स्थानकावरून गोळा करावे लागेल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

प्रवाशाने 24 तासांनंतर हरवलेल्या सामानाचा दावा न केल्यास, ते गाझियाबाद स्थानकावरील 'लॉस्ट अँड फाउंड' केंद्राकडे पाठवले जाईल, जे दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत खुले असेल, अशीही माहिती पुढे देण्यात आली.