Viral Video: हरियाणवी गाण्यावर रावणाचा जबरदस्त Dance, नेटकरी म्हणाले, "आदिपुरुष..."

देशभरात बुधवारी दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी यात काम करणाऱ्या कलाकारांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. 

Updated: Oct 6, 2022, 04:27 PM IST
Viral Video: हरियाणवी गाण्यावर रावणाचा जबरदस्त Dance, नेटकरी म्हणाले, "आदिपुरुष..." title=

Viral Video Ravan: देशभरात बुधवारी दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी यात काम करणाऱ्या कलाकारांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. असेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दसऱ्याच्या दिवशी रामलीलेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने हरियाणवी गाण्यावर ठेका धरला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकता की, '52 गज का दामन' हे गाणं लागतात रावण डान्स करत आहे. 

काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. @Poosworld1 नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मुसळधार पावसामुळे रावणाचा मृत्यू टळला, या आनंदात मंदोदरीसोबत रावणाने धरला ठेका.'

हा व्हिडीओ दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच बुधवार, 5 ऑक्टोबर रोजी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओवर लोक अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'हा रावण आदिपुरुष चित्रपटात असायला हवा.' दुसर्‍याने लिहिले आहे की, "सैफऐवजी आदिपुरुष या रावणाला घ्या'