वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI चा मोठा निर्णय; रेपो रेटबाबत घोषणा

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक 6 एप्रिल रोजी सुरू झाली. यानंतर आरबीआयकडून रेपो दराबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Apr 8, 2022, 03:17 PM IST
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI चा मोठा निर्णय; रेपो रेटबाबत घोषणा title=

मुंबई : RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या पतधोरण समितीच्या बैठकीत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केले. MPCने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्क्यांवर कायम आहे. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याची ही सलग 10वी वेळ आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटचा बदल केला होता.

रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिवर्स रेपो रेटमध्ये कोणेतीही वाढ करण्यात आलेली नाही. रिवर्स रेपो रेट अद्यापही 3.35 % वर कायम आहे. मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलिटी रेट आणि बँक रेट 4.25 टक्के असणार आहे.