मुंबई : आरबीआयची परीक्षा पहिल्यांदाच मराठीतून (RBI exam for the first time in Marathi) होणार आहे. हजेरीसहायक पदाच्या परीक्षेसाठी मराठीचाही पर्याय देण्यात आला आहे. मराठीतून परीक्षा होणार असल्याने मराठी विभागाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, मराठीसह अन्य 16 भाषांतून ही परीक्षा होणार आहे.
आरबीआयची (RBI) परीक्षा (Exam) पहिल्यांदाच मराठीतून (Marathi) देता येणार आहे. आरबीआयची परीक्षा इंग्रजी (English) आणि हिंदी (Hindi) या दोन भाषांमध्ये व्हायच्या मात्र राज्य सरकारने या परीक्षा मराठी आणि कोंकणी भाषेतूनही देता याव्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे प्रथमच आरबीआयने परीक्षेसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
आरबीआयने राज्य सरकारची मागणी मान्य केल्याने आता हजेरसहायक पदासाठी होणारी आरबीआयची परीक्षा आता मराठी आणि कोंकणी भाषेतूनही देता येणार आहे. हजेरीसहायक पदाची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. ही परीक्षा 120 गुणांची असून परीक्षार्थींना 90 मिनिटे मिळतील. भाषा प्रावीण्य चाचणी परीक्षा 9 आणि 10 एप्रिल रोजी देशातील 173 परीक्षा केंद्रांवर होईल.
नागपूर विभागात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथील केंद्रावर ही परीक्षा होईल. तसेच मुंबई विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सातारा केंद्रांवर परीक्षा होईल.