'नाटू-नाटू'चं हे भन्नाट रिक्रिएटेड व्हर्जन लावतंय सगळ्यांना वेड, नक्की पाहा Video

 सोशल मीडियावर 'नाटू-नाटू' चं रिक्रिएट व्हजर्न यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. 

Updated: Aug 3, 2022, 02:45 PM IST
'नाटू-नाटू'चं हे भन्नाट रिक्रिएटेड व्हर्जन लावतंय सगळ्यांना वेड, नक्की पाहा Video title=
recreated version of natu natu will surprised you on social media in marathi

Naatu Naatu Viral Video - आपण आनंदात असू किंवा दु:खात प्रत्येक मूडनुसार आपण गाणी ऐकतो. काही गाणी अशी असतात जी ऐकली की, आपण थिरकल्याशिवाय राहत नाही. साऊथ इंडियन गाण्यांचे तर आपल्याला शब्द पण कळत नसतात. तरी या गाण्यांवर डान्स करावसा वाटतो. असंच एक उर्जेने भरलं गाणी सध्या खूप गाजतंय. दिग्दर्शक एसएस राजामौलच्या ब्लॉकबस्टर हिट अॅक्शन फिल्म  'RRR'मधील 'नाटू-नाटू' (natu natu)हे गाणं. हे गाणं लहान मुलांपासून मोठ्यांच्या प्रत्येकाला माहिती आहे. दक्षिण अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या या दमदार डान्स स्टेप्सने सगळ्यांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर आपण शेकडो रील्स पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक रील तुफान व्हायरल झाली आहे. ( recreated version of natu natu will surprised you on social media in marathi)

'नाटू-नाटू' चं रिक्रिएट व्हजर्न लावतं वेड

अनेक महिने उलटून गेले असलेले तरी या 'नाटू-नाटू' गाण्याने लोकांना वेड लावलं आहे. आजही सोशल मीडियावर या गाण्याची क्रेझ दिसून येते आहे. सोशल मीडियावर 'नाटू-नाटू' चं रिक्रिएट व्हजर्न यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता, दोन बहिणींनी म्युझिकल वाद्ये वाजवून 'नाटू-नाटू' या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे या बहिणींनी एकसारखे कपडे घातले आहेत. 

हा व्हिडीओ यूट्यूब इंडियाने शेअर केला असून त्यावर कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''परफेक्ट नाटू-नाटू कवर नॉट एक्सिट्स'' हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो जास्त जास्त शेअरही करण्यात येत आहे. हा व्हिडीओ पाहून यूजरने म्हटलं आहे की, ''अरे माय गुडनेस...तुम्ही दोघेही अप्रतिम डान्सर आहात, धन्य राहा.'' तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, ''हा आतापर्यंतचा मनोरंजनाचा सर्वोकृष्ट रिक्रिएट व्हजर्न आहे, विलक्षण.'' इंस्टाग्रामवर आतापर्यंत 116 हजारांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.