RD की चिट फंड? कशात अधिक परतावा मिळतो? दोन्हीमध्ये गुंतवणूक आणि बचत करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, सर्व चिट फंड हे वाईट किंवा फसवे नसतात.

Updated: Aug 2, 2021, 04:31 PM IST
RD की चिट फंड? कशात अधिक परतावा मिळतो? दोन्हीमध्ये गुंतवणूक आणि बचत करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

मुंबई : चिट फंडची रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीशी तुलना ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण काळजी करण्याची गरज नाही. सर्व चिट फंड घोटाळेबाज नसतात. अलीकडच्या काही घटनांनी चिट फंडमध्ये लोकं पैसे टाकायला घाबरतात. कारण अशा फंडमध्ये काही सर्वसामान्य लोकांचे पैसे बुडले आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की लोक चिट फंडांमध्ये पैसे का गुंतवतात?  कारण काही लोकांकडे बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी योग्य कागदपत्र नसताता. तर काही लोकांना बँकीच्या कागदपत्रं समजत नाहीत, त्यामुळे त्यांना चित फंडचा मार्ग योग्य वाटतो. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या पैशांवर व्याज देखील मिळतो, त्याचबरोबर कागदपत्राची खटपट देखील करावी लागत नाही.

परंतु तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, सर्व चिट फंड हे वाईट किंवा फसवे नसतात. काही चिट फंड हे सरकारद्वारे चालवले जातात, ज्यात गुंतवणूक करणे सुरक्षित असते. रिकरिंग डिपॉझिट आरडीमध्येही अशीच गुंतवणूक केली जाते. यामध्ये परतावा निश्चित आणि गॅरेंटी देणारे असतात. या दोन्ही गुंतवणूकींचे त्यांचे फायदे आणि तोटे आहेत, जे समजून घेतल्यानंतरच त्यामध्ये गुंतवणूक करावी.

RD मध्ये गुंतवण्याचे फायदे

आरडीमध्ये ठेवीदार दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतो. त्याचे खाते बँकेत उघडले जाते. ठेवीच्या रकमेवर कालांतराने व्याज जोडले जाते. जेव्हा डिपॉझिट मॅच्यूअर होते तेव्हा ती रक्कम ठेवीदाराला दिली जाते. ठेवीदार मॅच्युरिटीच्या पैशाने FD उघडू शकतो किंवा तेच पैसे नवीन RD मध्ये गुंतवले जाऊ शकतात.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीने दरमहा 1,000 रुपयांसह RD खाते उघडले आणि 8% व्याज दराने 1 वर्षासाठी खाते चालवले. परिपक्वता झाल्यावर, व्यक्तीला 12,530 रुपये मिळतील कारण त्याने फक्त 12,000 रुपये दिले होते. त्याला एका वर्षात 530 रुपये व्याज मिळाले.

चिट फंड काय आहे?

चिट फंड ही एक प्रकारची बचत आणि कर्ज योजना आहे. यामध्ये अनेक ठेवीदार एकत्र येतात आणि दरमहा ठराविक रक्कम जमा करतात. चिट ग्रुपमध्ये सामील असलेल्या लोकांकडून पैसे घेतले जातात आणि दर महिन्याला त्याची बोली लावली जाते.

यामध्ये दरमहा चिट फंड कंपनीला कमिशन दिले जाते. दरमहा एक निश्चित रक्कम वगळता, जे काही अतिरिक्त पैसे शिल्लक असतील ते सर्व सदस्यांमध्ये समान प्रमाणात वितरीत केले जातात. जमा केलेल्या रकमेवर दरमहा बोली लावली जाते आणि एक सदस्य ती बोली जिंकतो. पुढील महिन्यात तो सदस्य बोली लावू शकत नाही.

बोलीमध्ये जिंकलेली रक्कम कर्जाच्या स्वरूपात प्राप्त होते, जी चिट फंडच्या ठराविक कालावधीत परत करावी लागते. जर तुम्ही चिट फंडमध्ये बोली लावली नाही, तर तुमचे पैसे आरडी प्रमाणे जमा होत राहतील आणि चिट फंडाच्या शेवटी व्याजासह त्यावर नफा दिला जाईल.

चिट फंडचा परतावा प्रत्येक महिन्यामध्ये सदस्यांमध्ये वितरित केलेल्या अतिरिक्त पैशावर अवलंबून असतो. जर सदस्यांमध्ये अधिक पैसे वितरित केले गेले तर शेवटी परतावा अधिक असेल. म्हणून, चिट फंडांमध्ये परताव्याची कोणतीही निश्चित मर्यादा नाही.

चिट फंड मध्ये लाभ कसा मिळवायचा?

समजा 20 लोकांनी मिळून 12 महिन्यांसाठी चिट फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सर्व सदस्य दरमहा 1,000 रुपये जमा करतात. पहिल्या महिन्यात 20,000 रुपये गोळा करणारी सर्वात कमी बोली 17,000 रुपये होती. या 17,000 नंतर, अतिरिक्त 3,000 रुपये शिल्लक होते. यामध्ये, चिट फंडचे आयोजक किंवा चिट फंड चालवणाऱ्या कंपनीला एकूण पैशांच्या 5% म्हणजेच 1,000 रुपये कमिशन मिळेल. उर्वरित 2,000 रुपये चिट फंडच्या 19 सदस्यांमध्ये वितरित केले जातील. अंदाजे एका व्यक्तीला 105 रुपये मिळतील.

अशाप्रकारे, पहिल्या पुढच्या महिन्यात प्रत्येक सदस्याला फक्त 895 रुपये (1000-105) द्यावे लागले. ही प्रक्रिया पुढील काही वर्षे सुरू राहील.