सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! 95,000 रुपयांपर्यंत पगार वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि सातवा वेतन आयोग यानुसार कशी पगारवाढ होणार पाहा

Updated: Aug 2, 2021, 03:49 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! 95,000 रुपयांपर्यंत पगार वाढ title=

मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खास खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आता त्यांचा पगार 95 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना सप्टेंबरपासून 28% महागाई भत्ता मिळेल अशी अशा आहे. याच दरम्यान सरकार लवकरच जूनसाठी महागाई भत्ता जोडू शकते. असे झाल्यास एकूण महागाई भत्ता 28% ऐवजी 31% होईल त्याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

जून 2021 चा महागाई भत्ता अजूनपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. जानेवारी ते मे 2021 या कालावधीमध्ये AICPI ने दिलेल्या आकडेवारीनुसार 3 परसेंट महंगाई भत्ता वाढणार आहे. JCM सेक्रेटरी (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे. मात्र याबाबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत हा महागाई भत्ता येईल याबाबत अद्याप माहिती दिली नाही. 

28 टक्के मिळणारा महागाई भत्त्यामध्ये अजून 3 टक्के वाढ झाली तर एकूण 31 टक्के महागाई भत्ता मिळू शकेल. जानेवारी 2020मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला. त्यानंतर जून 2020 मध्ये पुन्हा 3 टक्क्यांनी वाढला. आता जानेवारी 2021 महिन्यात 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढला आहे. (17+4+3+4+3) 11 टक्के महागाई भत्ता वाढल्याने तो 28 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामध्ये जूनच्या महागाई भत्ता एकत्र केला तर 31 टक्के वाढेल. 

केंद्र सरकारने गेल्या 18 महिन्यांपासून फ्रीझ महागाई भत्त्यावरील बंदी काढून टाकली आहे, कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 11%वाढ करण्यात आली आहे. आता केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 28% दराने DA आणि DR दिला जाईल. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ वेतन आणि श्रेणीनुसार वेतन वाढीची कल्पना त्यामुळे येऊ शकेल असंही सांगण्यात आलं आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्य़ांना लेव्हल-1 च्या पगारात 18 हजार रुपयांपासून ते 56900 रुपयांपर्यंत मिनिमम बेसिक सॅलरी 18 हजार रुपये आहे. त्यावरच कॅलक्युलेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता हा त्याला जून ते सप्टेंबरपर्यंत त्यांना महागाई भत्ता मिळाला तर त्यांना फायदा जास्त मिळेल असं सांगितलं जात आहे. 

उदाहरण घ्यायचं झालं तर 18 हजार रुपयांच्या बेसिक सॅलरीवर एकूण वर्षाला महागाई भत्ता 60 हजार 480 रुपये मिळेल.तर नव्या महागाई भत्त्यानुसार महिन्याला 5 हजार 40 रुपये वाढवण्यात आले आहेत. त्याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी -18 हजार रुपये महिना
नवीन महागाई भत्ता 31% - 5 हजार 580 रुपये महिना
आतापर्यंतचा महागाई भत्ता 17% - 3 हजार 060 रुपये महिना
किती महागाई भत्ता वाढला - 5580-3060 = 2520 रुपये महिना
वार्षिक पगार वाढ - 2520X12= 30,240 रुपये
----------------------------------------------------------------
कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी-  56900  रुपये महिना
नवीन महागाई भत्ता 28% - 15932  रुपये महिना
आतापर्यंतचा महागाई भत्ता  17%-  9673 रुपये महिना
किती महागाई भत्ता वाढला-  15932-9673 = 6259 रुपये महिना
वार्षिक पगार वाढ - 6259X12= 75108  रुपये महिना
-----------------------------------------------------------------------
DA कॅल्युलेशननुसार कसं होईल पाहूया
कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी- 56900 रुपये महिना
नवीन महागाई भत्ता 31% - 17639 रुपये महिना
आतापर्यंतचा महागाई भत्ता  17%- 9673 रुपये महिना
किती महागाई भत्ता वाढला- 17639-9673 = 7966 रुपये महिना
वार्षिक पगार वाढ- 7966X12= 95,592 रुपये