मुंबई : लांब पल्ल्याच्या ट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं आता बंद होणार आहे.
पेपरलेस काम करू करू पाहणार्या सरकारने काही विशिष्ट स्थानकातून सुटणार्या ट्रेन कोच बाहेर चार्ट लावणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसटी, चैन्नई सेंट्रल, कोलकाता, हावड़ा जंक्शन आणि सियालदह या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. रिझर्व्हेशन चार्ट वर रिझर्व्ह कोचमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांचे नाव आणि सीट नंबर यांची माहिती दिलेली असते. पण आता ही सोय बंद होणार आहे. त्यामुळे आरएसी किंवा तिकिट कन्फर्म झाली आहे की नाही ? याची खात्री करणं प्रवाशांना थोडे कठीण होणार आहे.
चार्ट लावला नसला तरीही ट्रेनमधील टिसी किंवा इतर काही पर्यायांचा वाप्र करून तुम्ही तिकिट कन्फमेशनची पडताळणी करू शकता.
आता कसे पहाल तिकिट कन्फर्म आहे की नाही ?
आईआरसीटीसी (IRCTC) या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर पीएनआर स्टेटस पाहता येते.
मोबाईलमध्ये एम एंडिकेटरवरही पीएनआर स्टेट्स पाहण्याची सोय आहे.
१३९ या रेल्वेच्या हेल्पलाईनवर तुम्हांला पीएनार स्टेटसची माहिती मिळू शकते.
इंटरनेटची सोय नसल्यास तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जा. तेथे मेसेज बॉक्समध्ये नवा मेसेज लिहण्यासाठी बॉक्स उघदा. तेथे PNR लिहून स्पेस द्या पुढे तुमचा पीएनआर नंबर लिहा. व तो 5888,139,5676747 किंवा 57886 यापैकी एका नंबरवर पाठवा. तुम्हांला मेसेजद्वारा तुमचे पीएनआर स्टेट्स समजेल.