मनी लॉंड्रींग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची तिसऱ्यांदा होणार चौकशी

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी होत आहे.

Updated: Feb 9, 2019, 12:42 PM IST
मनी लॉंड्रींग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची तिसऱ्यांदा होणार चौकशी  title=

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी होत आहे. त्यासाठी ते ईडी कार्यालयात दाखल झालेत. रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी तिसऱ्यांदा हजर राहाव लागत आहे. याआधी ६ आणि ७ फेब्रुवारीलाही वाड्रांची चौकशी झाली होती. इडीने तपासादरम्यान जप्त केलेल्या दस्तावेजांबाबत आज वाड्रांना प्रश्न विचारण्याची शक्यता आहे ज्यात संजय भंडारी या फरार झालेल्या मध्यस्थीचा उल्लेख आहे. वाड्रा यांच्या दुसऱ्या दिवशी केलेल्या चौकशीनंतर त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते असे सांगण्यात आले होते. 

ब्रिटनमध्ये कथित रुपात संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी त्यांना प्रश्न विचारले जाणार होते. मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहिमेत एजंसीला सापडलेली कागदपत्रे त्यावेळी वाड्रा यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. यामध्ये फरार डिलर संजय भंडारी यांच्याविषयी संबंधित कागदपत्रे देखील होती. 

वाड्रा यांची चौकशी करणाऱ्या टीममध्ये संयुक्त संचालक, उप संचालक आणि 5 इतर अधिकारी होते. शनिवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने वाड्रा यांच्या आगाऊ जामीन याचिकेवर मनी लॉंड्रींग केसमध्ये ईडीने त्यांच्या अटक 16 फेब्रुवारी पर्यंत थांबवली होती. वाड्रा यांना शोधात सहकार्य करण्याचे निर्देश देताना ईडीला 16 फेब्रुवारीला चौकशीची परवानगी दिली होती. 

वाड्रा यांची बाजू 

Image result for robert vadra zee news

वाड्रा यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले. कॉंग्रेस पार्टी देखील वाड्रा यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. ईडीच्या चौकशी दरम्यान प्रियांका गांधी देखील ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. मी आपल्या पतीसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते.