तुम्ही आज RTGS चा वापर करणार असाल तर थांबा! तुमच्यासाठी महत्वाची बातमी

आज RTGS सेवा काही तासांसाठी बंद असणार आहे. दरम्यानच्या तासात तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकत नाही.

Updated: Apr 18, 2021, 08:34 AM IST
तुम्ही आज RTGS चा वापर करणार असाल तर थांबा! तुमच्यासाठी महत्वाची बातमी

नवी दिल्ली : तुम्ही RTGS सेवेचा उपयोग करीत असाल तर, रिझर्व बँकेच्या नुकत्याच आलेल्या सूचनेबाबत तुम्हाला माहिती हवी.  रिझर्व बँकेने ट्वीट करून सांगितले आहे की, दोन लाखापेक्षा अधिकच्या रक्कमेच्या व्यवहारांसाठी RTGS सेवा 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 18 एप्रिल दुपारी 2 वाजेपर्यंत बंद असणार आहे. 18 एप्रिल रोजी दुपारी 2 नंतर या सेवेचा ग्राहकांना उपयोग करता येईल.

रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार, RTGS सेवा 17 एप्रिलच्या मध्यरात्री ते 18 एप्रिल दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत डेटा रिकवरी सिस्टिम अपग्रेड करण्यासाठी ही सेवा ठरावीक वेळात बंद ठेवण्यात येणार आहे.

2 लाखापेक्षा कमी रक्कमेच्या व्यवहारांसाठी NEFT सेवा नियमितपणे काम करणार आहे.