Stock To Pick | शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी फक्त 118 रुपयांचा हा शेअर काही महिन्यात दमदार रिटर्न देणार

 शेअर बाजाराची चाल लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी बंपर रिटर्न देणारे स्टॉक घेऊन येत असतो. 

Updated: Aug 16, 2021, 03:31 PM IST
Stock To Pick | शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी फक्त 118 रुपयांचा हा शेअर काही महिन्यात दमदार रिटर्न देणार  title=

मुंबई : शेअर बाजाराची चाल लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी बंपर रिटर्न देणारे स्टॉक घेऊन येत असतो. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला नफा कमावता येतो. अशाच चांगल्या स्टॉकच्या तुम्ही शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी जबरजस्त स्टॉक घेऊन आलो आहोत. झी मीडियावर नेहमीच शेअर बाजारातील तज्ज्ञ चांगल्या स्टॉकची माहिती देत असतात. असेच एक मार्केट एक्सपर्ट म्हणजेच संदीप जैन होय. त्यांनी त्यांच्या पिटाऱ्यातून असा स्टॉक आपल्यासमोर ठेवला आहे की त्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी Rubfila International या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर संदीप जैन यांच्या फेवरेट लिस्टमध्ये सामिल आहे. नुकतेच कंपनी IPO जारी केला होता. ज्यामध्ये संदीप जैन यांनी IPO सबस्क्राइब केला होता. परंत त्यांना शेअर अलॉट झाले नाही.  कंपनीने सलग 3 तिमाहीमध्ये आपला PAT वाढवला आहे. मागील चार तिमाहीत 8 कोटी, 10 कोटी, 11 कोटी आणि 12 कोटींचा PAT जारी केला आहे.

कसे आहेत कंपनीचे फंडामेंटल्स?
संदीप जैन यांच्या नजरेत कंपनीचे फंडमेंटल्स खूपच मजबूत आहेत. त्याशिवाय शेअरची रिटर्न ऑन इक्विटी 23-24 टक्के आहे. तसेच डिविडंड यील्ड 1.15 टक्क्यांच्या आसपास आहे. संदीप जैन यांच्या मते शेअरमध्ये एन्ट्री करण्यासाठी सध्याचे लेवल उत्तम आहेत. सिलिकॉन थ्रेड बनवण्यासाठी ही कंपनी देशातील सर्वात मोठी प्लेअर आहे.

Rubfila International - Buy Call
शेअरची सध्याची किंमत 118.15
लक्ष 130-140
अवधी - 3-6 महिने

काय करते कंपनी?
कंपनी रबरचे थ्रेड बनवते. ही कंपनी 1994 पासून कार्यरत आहे. आणि सिलकॉन थ्रेड बनवते. याशिवाय बंजी जंपिंगमध्ये वापरात येणारा थ्रेड देखील ही कंपनी बनवते.