नववधू सोबत डान्स करताना पाहूण्यांसमोर नवरदेव शरमेनं लाल... असं काय घडलं पाहा व्हिडीओ

लग्न हा प्रत्येक वधू-वरासाठी महत्वाचा दिवस असतो, कारण त्या दिवसापासून ते आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करतात.

Updated: Aug 16, 2021, 02:15 PM IST
नववधू सोबत डान्स करताना पाहूण्यांसमोर नवरदेव शरमेनं लाल... असं काय घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई : लग्न हा प्रत्येक वधू-वरासाठी महत्वाचा दिवस असतो, कारण त्या दिवसापासून ते आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करतात. म्हणून लग्नाचा प्रत्येक क्षण लक्षात रहावा अशी वर आणि वधूची इच्छा असते. त्यासाठी ते महिनाभर आधीपासून लग्नाच्या तयारीला लागतात. कारण त्यांना त्यादिवशी काहीही कमी पडू नये असे वाटते. त्यांना असे देखील वाटते की, त्यांचे लग्न सगळ्यांच्याच लक्षात रहासवे. त्यासाठी ते लग्नासाठी खूप पैसे खर्च करतात. सुंदर दिसण्यासाठी महागातले कपडे विकत घेतात. जेणे करुन लग्नात सगळे त्यांच्याबद्दल बोलतील आणि त्यांच्याकडेच पाहातील.

परंतु काही वेळा वधू वरासोबत असे काहीतरी घडते की, ज्यामुळे त्यांना उपस्थितांसमोर लाजिरवाणे होण्याची वेळ येते आणि कोणत्यातरी भलत्याच कारणाने ते लोकांच्या लक्षात रहातात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याला पाहून तुम्हाला तुमचे हसू अवरणार नाही. परंतु त्यानंतर नवरदेवाला मात्र लग्नात कोणाला तोंड दाखवायला जागा उरली नाही. परंतु तरीही नवर देवानी परिस्थिती चांगली हाताळली.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, वर आणि वधू क्रिश्चन धर्मीय आहेत. तसे पाहाता हे दोघेही वयाने मोठे दिसत आहे.  लग्नानंतर वर आणि वधू डान्स करत आहेत. लग्नाच्या दिवासाचे ते केंद्र बिंदू असल्याने सगळयांचेच लक्ष त्यांच्याकडे टिकून आहे. डान्स करताना नववधू आणि वरामधील केमिस्ट्री एकदम सुंदर दिसत आहे आणि हे कपल 'मेड फॉर इच अदर' दिसत आहेत. परंतु हा डान्स करता करता या वराची पॅन्ट अचानक खाली येते. ज्यामुळे या नवरदेवाला सर्वासमोर शरमेनं लाल होण्याची वेळ येते. परंतु यानंतरही अजिबात संकोच न करता आत्मविश्वासाने हा नवरदेव परिस्थिती हाताळतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओला younglandlord01 या अकाउंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टार्गामवर शेअर करण्यात आले आहे. त्यानंतर आतापर्यंत सुमारे 5 हजार लोकांनी हा व्हायरल व्हिडीओ पाहिला आहे. लोकांना या नवरदेवचा आत्मविश्वास फार अवडला आहे. यावर लोकांनी त्याच्या लग्नातील काही घटना देखील शेअर केल्या आहेत.